Saturday, July 5, 2008

"दादोजी गुरु असल्याचे पुरावे" असतील तर ते सादर करा ना.. !!!!



स्वराज्याचा विरोधक हीच दादोंजीची खरी ओळख

(वाचा -चित्रलेखा चा दिवाळी अंक ; चंद्रशेखर शिखरे यांचा लेख)









दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु नव्हते....

4 Jul 2008, 0019 hrs IST(maharshtra times)






दादोजी कोंडदेव-dadoji konddev छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते, या ऐतिहासिक सत्याचा शोध घेण्याची मोहीम सुरु झाली आहे. खुद्द शिक्षण व क्रीडामंत्री प्रा. वसंत पुरके यांच्याकडे मोहीमेचे नेतृत्व सोपविण्यात आले असून त्यांच्या मदतीला इतिहासकारांची फौजही तैनात करण्यात आलीय. या सत्याचा उलगडा झाला की, दादोजी कोंडदेव(dadoji konddev) यांच्या नावाने क्रीडा प्रशिक्षकांना मिळणा-या या पुरस्काराचे नाव बदलायचे की नाही, याचा निर्णय होईल. शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवछत्रपती व दादोजी कोंडदेव पुरस्कारांची घोषणा अपेक्षिĤ असते. परंतु यंदाच्या वषीर्चे पुरस्कार अद्याप जाहीर झालेले नाहीत. पुरस्कार विजेत्यांच्या नावावरुन दरवषीर् होणारा गोंधळ ही नित्याचीच बाब झाली असताना आता पुरस्काराच्या नावावरुनच नव्या वादाला तोंड फुटले आहे. अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार, तर त्यांना घडवणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना शिवरायांचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. १९८८-८९ पासून दरवषीर् कोंडदेव पुरस्कार दिला जातो. परंतु दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केल्याची बाब योग्य नसून, ते महाराजांचे गुरु नव्हते, असा आक्षेप संभाजी ब्रिगेड, छावा यासारख्या अनेक सामाजिक संघटनांनी घेतला होता. कोंडदेव यांच्या नावाचा हा पुरस्कारच बंद करावा किंवा त्याचे नाव बदलून शहाजीराजे किंवा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावाने देण्यात यावा, अशी या संघटनांची मागणी आहे. गेल्या २-३ वर्षांपासून सुरू असलेला हा वाद कायम निकाली काढण्यासाठी सरकारने शालेय शिक्षण व क्रीडामंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली खास समिती नियुक्त केली आहे. या समितीत अनेक इतिहासकार व इतिहास अभ्यासकांचा समावेश आहे. ही समिती पुढच्या दोन आठवड्यात कोंडदेव पुरस्काराबाबत विविध संघटनांचे लेखी अभिप्राय व मते मागवणार आहे. हे अभिप्राय व ऐतिहासिक दस्तावेज यांचा एकत्रित विचार करुन येत्या तीन महिन्यात समिती अहवाल सरकारला सादर करेल. त्यानंतरच पुरस्काराला कोंडदेव यांचे नाव द्यायचे की नाही, याचा निर्णय होईल, अशी माहिती क्रीडा खात्यातील सूत्रांनी दिली.

पुरकेंच्या अध्यक्षतेखालील या समितीत क्रीडा राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे, डॉ.आ. ह. साळुंखे, निनाद बेडेकर, विजय देशमुख, गजानन मेहेंदळे, डॉ. अ. रा. कुलकणीर्, प्रा. अनुराधा रानडे, जयसिंगराव पवार, डॉ. वसंतराव मोरे,श्रीमंत शिवाजी कोकाटे, गंगाधन बनबरे, चंदशेखर शिखरे, प्रवीण गायकवाड, क्रीडा व युवक सेवा संचालक यांचा समावेश असणार आहे.







Dadaji Kondadev Award Controversy- Maharashtra Govt. Formed Committee.



At last State Govt agreed to form a committee settle 'Dadu Kondadev Award' issue. Since last two decades this state sponsored award, one of the greatest blunder on earth, has been offered to the prominant personalities in the sports field who have honed players to become international quality sportsman/woman.

We have been opposing this award due to its title Dadu Kondadev as he was the mentor of Chatrapati Shivaji Raje has no evidence with State Govt. This unhistorical title, in fact, is denigrating our inspiration.

State Govt has formed a committee of historians to settle this controversy. Shiv. Shrimant Kokate, A H salunkhe, Gangadhar Banbare,A.R.Kulkarni.G.B.Mehendale,vijay Deshmukh, Chandrashekhar Shikhare, ninad Bedekar, jaysingrao pawar,anuradh ranade are among this committee.



Dadu Konddeo as Chatrapati Shivaji Raje's mentor ? Govt has no historical proof.

-State Cultural Deptt., Maharashtra.



Cultural Deptt, Maharashtra State in a letter to Pune Munciple Corporation stating that there is no historical proof that Chatrapati Shivaji Raje's mentor.

This erupted into a row with Maratha Seva Sangh (MSS) and Sambhaji Brigade, which believe that Konddev was not Chatrapati Shivaji Raje's guru but only an officer appointed to look after the Kondhana fort near Pune, seeking the removal of Konddev’s statue in 2004.This led to the closure of Lal Mahal, a major tourist destination in Pune. It was reopened only recently.

Now, the culture department’s letter has made the PMC do a rethink. Municipal commissioner Nitin Kareer has said the corporation will renovate the tableau by adding Shivaji’s father Shahaji’s statue. ‘‘We may remove Konddev’s statue,’’ said Kareer.

However, the Maratha Seva Sangh says some historians have deliberately portrayed Konddev and Ramdasswami as Shivaji’s gurus. Shivshri Purushottam Khedekar said, ‘‘The State government has realised its mistake after so many years. It should correct it with immediate effect.’’

Historians too are divided. Maratha history expert from Kolhapur Jaysingh Pawar says, ‘‘Available documents don’t mention Konddev’s name but some historians have intentionally maintained that he was Shivaji’s teacher. The culture department’s letter shows this is a baseless claim.’’

(extracted from Indian Express,17th June 2006)






दादोजी गुरु असल्याचे पुरावे नाहीत...!!!





ही बातमी मोठ्या स्वरूपात पाहण्यासाठी Double Click करा.



























जाहिर आवाहन : "दादोजी गुरु असल्याचे पुरावे" असतील तर ते सादर करा ना.. !!!!







इतिहास संशोधक गजानन मेहेंदले,पांडुरंग बलकवडे,बाबासाहेब पुरंदरे,निनाद बेडेकर यांच्यासाठी...





चौथीचे किंवा विद्यापिठाचे पुस्तक हा इतिहासाचा पुरावा असू शकतो काय..???







"मराठा विकास परिषद" या संघटनेने पुण्यात एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्या चर्चासत्राचा विषय "दादोजी कोंडदेव कोण होते ?"असा होता...त्यासाठी गजानन मेहेंदले,पांडुरंग बलकवडे,बाबासाहेब पुरंदरे,निनाद बेडेकर ह्यांना बोलावले होते ....ते अनुपस्थित का बरे राहिले...??? चर्चेसाठी समोर का येत नाहीत... आम्ही सत्यशोधन समितीत नाही असे म्हनतात... वर तोंड करून पत्रकार परिषदा घेतात...पुरावे आहे म्हनतात...मात्र एकही सादर करत नाहित... याला काय म्हणावे...???










प्रतिइतिहास ह्या चंद्रशेखर शिखरे यांच्या ग्रंथातील "हिंदवी स्वराज्याचे प्रेरणा स्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही"ह्या प्रकारनातिल पृष्ट क्र.५९ वरील उतारा येथे देत आहोत...


शिवाजी महाराजांसोबत शाहजी राजांनी काही नोकर दिले होते,शाहजी राजांच्या पुणे परिसरातील काही मुकाशांचा कारभार त्यांच्यावतीने दादोजी कोंडदेव हा "शाहजीराजांचा खासगी नोकर" पाहत असे, तो पुणे परगन्यातील पाट्स विभागातील मलठान गावचा कुलकर्णी होता,काही इतिहासकारांनी दादोजी कोंढान्याचा सुभेदार असल्याचे लिहिले आहे,परंतु कोंढाना परिसरातील शाहजीराजांच्या मुलखाचा कारभार पाहण्यासाठी शाहजी राजांनी मुतालिक म्हणून त्याची नेमणूक केली होती.अर्थात "दादोजी हा आदिलशहाचा अधिकारी नव्हता तर शाहजीराजांचा खासगी नोकर होता", १६४१-४२ मध्ये शिवाजीराजे पुण्याला येण्यापूर्वी तो शाहजीराजांच्या आज्ञा पाळत असे.(गजानन भास्कर मेहेंदळे,श्री राजा शिवछत्रपती,खंड १ भाग १,पूर्वोक्त पृष्ट क्र.६०५ व ६०९ वरील तळटिप क्र 54)





शिवाजीराजे पुण्याला आल्यावर तो, त्यांच्या आणि जिजाबाईंच्या आज्ञा पाळत असे. बरयाच उत्तरकालीन बखरकारांनी व काही तथाकथित इतिहासकारांनी या दादोजीला शिवाजी महाराजांचा बालपणीचा गुरु करून शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्राथमिक कार्याचे श्रेय देण्याचा प्रयत्न केला आहे, काही इतिहासकारांनी शिवरायांना शस्त्रास्त्राचे शिक्षण दादोजीने दिल्याचे चित्र रंगविले आहे.



यावरून प्रेरणा घेवून महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकासाठी "दादोजी कोडदेव पुरस्कार" देखिल सुरु केला आहे व "दादोजी कोडदेव स्टेडियम"या नावाने मोठे स्टेडियम ठाणे येथे तयार केले आहे, दादोजीने शिवाजी महाराजाना कोणत्याही प्रकारचे शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिल्याचा किंवा स्वराज्यकार्यास प्रेरणा दिल्याचा अथवा मदत केल्याचा एकही उल्लेख समकालीन साधनांमध्ये नाही.





दादोंजींचे इतिहासतील स्थान -



"राधामाधवविलासचंपू, शिवभारत, जेधे शकावली या सर्वात विश्वसनीय समजल्या जानारया समकालीन साधनांमध्ये दादोजीचा उल्लेखच नाही,स्वराज्य कार्यात लहान-मोठे योगदान दिलेल्या अनेक व्यक्तींचे उल्लेख या ग्रंथात असताना दादोजीचा साधा उल्लेखही नसणे ही गोष्ट शिवाजीराजांच्या स्वराज्यकार्यातील व जीवनातील दादोजीचे गौण स्थान दर्शविते."





असा माणुस शिवरायांचा गुरु किंवा मार्गदर्शक असू शकतो काय ?





दादोजी च्या स्वभावातील आणखी एका पैलूचे दर्शन करणारी सनद-पत्रांमध्ये उपलब्ध आहे, रंगनाथ कुलकर्णी यास दादोजीने विष देवून ठार मारल्यानंतर त्याचा मुलगा विसाजीची पत्नी भानाबाई हिस जिजाऊंनी चोली काकणाबद्दल जमीन इनाम दिल्याची हकीकत सनदेमध्ये आहे. शिवाय चुकीच्या न्याय दिल्याच्याही नोंदी सनदेमध्ये आहेत .



"प्रतिइतिहास"-चंद्रशेखर शिखरे.

जिजाई प्रकाशन,पुणे.

अधिक् माहितीसाठी वाचा-





http://www.pratiitihas.blogspot.com/





सध्या गाजत असलेल्या "जिजाऊसाहेब" ह्या ऐतिहासिक कादंबरीतील शिवराय व दादोजी यांचा संवाद -

"आपल्यात आणि आमच्यात हाच फरक आहे,पंत!आपले विचार पलायनवादी आहेत,समोरचं वास्तव बदलून नव्या व्यवस्थेचा विचारही आपल्याला सुचनार नाही.कारण नवा विचार अंमलात आनन्यासाठी जुन्या विचारांना तिलांजली द्यावी लागते, ती बाब आपल्या आवाक्यातील नाही. आपली मानसिकता जुनाट आहे, स्थितिप्रिय आहे, रुढीवादी आहे, आणि कर्मवादी देखिल आहे. आणि आम्ही प्रतिनिधित्व करतो ते नव्या विचारांचं, नव्या व्यवस्थेचं.कर्मवादी परंपरेला ठोकरून लावनारया विचारांचं...."






" पंत,आमचे आबासाहेब तेव्हढे स्वत्व राखून आहेत.बाकी त्यांच्या पिढीने आपले स्वत्व केंव्हाच गमावलं आहे,आबासाहेबांच्या खांद्यावर साम्प्रत आम्ही उभे आहोत.आणि आमच्या हाती आहेत आम्ही पाहिलेली स्वराज्याची स्वप्न..! आबासाहेब आणि आऊसाहेबांकडून आम्ही स्वराज्याची प्रेरणा घेतली."





"या स्वराज्यकामी आपल्या सारखे बुजुर्ग आमच्या पाठी उभे राहतील अशी अपेक्षा होती....पण स्वराज्यनिर्मितीस पाठबळ देण्यापेक्षा आपल्याला व्यक्तिगत जिविताची चिंताच अधिक जाणवते.असं दिसतयं .पंत ...आपण आपला विचार सांगितला आम्हाला तो नाउमेद करणारा वाटतो......आमचा विचार नेक आहे..तो आम्ही अंमलात आननारचं...."



दादोजी शिवरायांचे गुरू नव्हतेच!





13 Oct 2008, 0149 hrs IST

डॉ. जयसिंग पवार यांचा पुनरुच्चार

म. टा. वृत्तसेवा। कोल्हापूर -' दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराजांच्या नात्याबाबत वितंडवाद सुरू असतानाच, दादोजी हे महाराजांचे गुरू, शिक्षक किंवा मार्गदर्शक यांपैकी काहीही नव्हते', असा दावा महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे सवेर्सर्वा डॉ. जयसिंगराव पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात नियुक्त केलेल्या सत्यशोधन सिमितीचे पवार हे सदस्य होते. दादोजी महाराजांचे गुरू होते, असे म्हणणाऱ्यांवर त्यांनी यावेळी खरपूस टीका केली. 'रानडेंपासून शेजवळकरांपर्यंतच्या इतिहासात कोेंडदेव गुरू होते, असा उल्लेख कुठेही नाही. जेम्स लेनच्या विकृत वक्तव्यातून हा वाद उद्भवला. त्यानिमित्तानेच वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा आपला प्रयत्न आहे', असे ते म्हणाले. ' खऱ्या-खोट्याची शहानिशा करण्यासाठी गेले दोन महिने आपण ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यानंतर दादोजी शिवाजी राजांचे गुरू नव्हते, या निष्कर्षाप्रत आलो. दादोजी हे केवळ प्रशासक होते. त्यांच्यापासून महाराजांनी प्रेरणा घेतली, असे कुठेही नमूद केलेले नाही', असे त्यांनी स्पष्ट केले. 'इतिहास कायम नसतो, जसे संशोधन होते, पुरावे मिळतात, तसा तो बदलत जातो', असेही ते म्हणाले. इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. वसंत मोरे यांनीही त्यांचे समर्थन केले.





कोंडदेवांच्या नावाने पुरस्कार दिल्यास कार्यक्रम उधळण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा

-कोल्हापूरकोल्हापूर, ता. १० - शासनाने दादोजी कोंडदेव नावाने क्रीडा पुरस्कार दिल्यास पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील यांनी शुक्रवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत दिला. इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून दादोजी कोंडदेव यांचा खŋटा इतिहास काढून टाकावा व शहाजीराजे यांच्या नावे क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. हुजरे-पाटील म्हणाले, की श्रेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी जेधे शकावली व जेधे करीना या शिवकालीन कागदपत्रांत दादोजी कोंडदेव यांचा गुरू म्हणून उल्लेखच सापडत नसल्याचे म्हटले आहे. शिवचरित्रकार कृष्णाजी केळूसकर यांनी कोंडदेव हे हुशार व इमानदार नोकर होते, असे लिहिले आहे. इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांनीदेखील कोंडदेव गुरू नव्हते, असे प्रतिपादन केले आहे. अशा या दिग्गज इतिहासकारांच्या अभ्यासातून दादोजी गुरू नसल्याचे सिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या नावे पुरस्कार देणे चुकीचे आहे. शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाशी कोंडदेवांचा काडीचाही संबंध नाही. शिवरायांचे खरे गुरू शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, राष्ट्रसंत तुकाराम महाराज होते. या पत्रकार परिषदेस डॉ. राजीव चव्हाण, अजय हारूगले, विकास जाधव, प्रा. राजेंद्र यादव, उमेश पोवार, बाळासाहेब पाटील, कुलदीप खुटाळे, बाळासाहेब पाटील, वसंत पाटील, अशोक खाडे, संतोष पाटील, विनोद खोत, अजित सूर्यवंशी, दीपक कनुरे, सुनील हराळे, कृष्णात सादळकर आदी उपस्थित होते.





सदानंद मोरे यांचे मत -दादोजी कोडदेव यांचा स्वराज्याला विरोध होता असा एक प्रवाद महाराष्ट्रात आहे,त्या मुले त्याना गुरुस्थानी बसवीने अयोग्यच आहे. (IBN Lokmat-31 sept 2008,9:30pm)



इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. वसंत मोरे यांचे मत- ‎दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते ,आम्ही जातीभेद करत नाही.





जेष्ठ संशोधक अ रा कुलकर्नी यांचे मत -दादोजी हे गुरु असल्याचा कुठलाही दाखला इतिहासात नाही.



अनंत दारवटकर यांचे मत (संक्षिप्त स्वरूपात) - दादोजी हा स्वराज्याचा विरोधक असल्याचे समजू नये.म्हणुन त्याला गुरुस्थानी बसविन्याचा खटाटोप करण्यात आला असल्याचे दिसते.मरेपर्यंत दादोजीने कोंडाना किल्ला स्वराज्यात सामिल केला नव्हता,दादोजिची समाधी ही कुठे बांधली गेली नाही...........

[मराठा मार्ग - जुलै व ऑगस्ट २००८]



प्रवीण गायकवाड यांचे मत - संभाजी राजांनी लिहीलेल्या "बुधभूषण" या ग्रंथात दादोजीचा उल्लेखही नाही, तसेच कुठल्याही समकालीन ग्रंथात साधा उल्लेखही नाही,शिवाजी राजांच्या मृत्युनंतर दिडशे वर्षानी लिहिलेल्या बखरीमध्ये दादोजीचे उदात्तीकरण झाले. रानडेंपासून शेजवळकरांपर्यंतच्या इतिहासात दादोजीचा गुरु असा उल्लेख नाही,ह्या उदात्तिकरानाचा समाचार महात्मा फूले,केलुस्कर व अनेक इतिहासकारांनी घेतला आहे...हां वाद फार जुना आहे..परंतू दादोजीचे उदातिकरण २० व्या शतकात अतिशय कुटिलपने करण्यात आले,साधा उल्लेख ही नसलेल्या दादोजी वर बाबासाहेब पुरंदरे सारखे शाहिर (इतिहासकार नव्हे) त्यांच्या ग्रंथात ४३ च्या वर पाने लिह्तात ..चौथीच्या पुस्तकासाठी पुरंदरेच्या पुस्तकाचा आधार घेतला जातो.. हेच पुस्तक जेम्स लेन सारख्या लोकांना पुरविले जाते,जोक्स सांगितले जातात,विकृतिकरण केले जाते, अश्या प्रकारे स्वराज्याचा विरोधक गुरु स्थानी बसविला जातो, पुढे जेम्स लेन मार्फ़त विकृतिकरण करण्यात येते..पुरस्कार बंद करन्यासाठी विरोध केला जातो..!!!



महाराष्ट्र शासनाच्या सत्यशोधन समितिला २,५०० पत्र आली असून ह्या पत्रामध्ये दादोजी हा खासगी नोकर असल्याचा उल्लेख आहे.दादोजी हा गुरु असल्याचा कुठलाही पुरावा नाही,म्हणुन लोकमताचा आदर राखून निर्णय घ्यायला हवा ,असे प्रतिपादन समिति सदस्य तथा जेष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.सालुंखे ह्यानी केले आहे.





visit-

http://www.sambhajibrigade.blogspot.com/



http://bhaktishakti.blogspot.com/2007/12/lalmahal-dadu-konddev-and-pune_12.html






Pravin Gaikwad, a member of the fact-finding committee on Konddeo however said the committee has so far not get a single evidence to prove Konddeo was indeed a mentor of Chhatrapati Shivaji."At the first meeting, we suggested that the committee should make a public appeal to seek evidence. There were over 5000 letters to the committee, but none could support the theory. None of the available historical documents make a mention of his name. Above all, Konddev doesn't even figure in the book 'Buddhbhushan' written by Shivajiraj's son Sambhaji," he said. Gaikwad claimed Dadoji Konddeo became a mythical figure after the publication of Shiv Charitra, a 'fictional book' by Babasaheb Purandare. "He created a character spending over 43 pages on the man who was a servant of Adilshahi," Gaikwad said.









dadoji konddew dadoji konddev dadoji konddeo



3 comments:

Unknown said...

Dear , Firstly thanks for the nice collection, n i hope very soon Chhatrapati Shivaji Raje will be free from the fake Guru, waiting for the govt. result.
Also i want to thanks to Maratha Seva Sangh and Sambhaji Brigade for their contribution in this issue.
Jai Jijau- Jai Shivrai

प्रकाश पोळ said...

Dadu Kondadev ha shivrayancha guru navatach, tyamule krida margadarshak puraskarache nav badalanech changale.
Jai Jijau Jai Shivarai

Unknown said...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासात दादोजी कोंडदेव हे नावच मुळात नव्हते पण इतिहासात या मनुवादी आर्यांनी ढवळा ढवळ करण्याचे काम केले होते
तसेच एक आणखी व्यक्ती आहे ज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात कोणत्याही प्रकारचे घेणे देणे नसून सुद्धा या पुरंदरे ला राजेंच्या इतिहासाशी जोडण्याचे काम इथल्या पूर्वीच्या आर्यांनी म्हणजेच आजच्या मनुवादी लोकांनी केले होते जे संभाजी ब्रिगेड संघटनेने हाणून पाडण्याचे काम केले त्यासाठी संभाजी ब्रिगेड व चंद्रशेखर सर असतील किंवा साळुंके सर असतील आशा सत्यवादी विचारांने आम्हाला प्रेरणा मिळत आहे त्यामुळे त्यांचे आभार जय जिजाऊ जय शिवराय जयभिम