महात्मा फुलेंनी इतिहासातील घुसखोरी बद्दल, आगन्तुकी करणाबद्दल , बनावटी करणा बद्दल एका पत्रात उल्लेख केलेला आहे...
------------- मुक्काम पुणे त|| २ माहे जून १८८६ ई||
.........राजमान्य राजेश्री नारायणराव माधवराव परमानंद मु|| आंबेर
......................... साष्टांग नमस्कार वि.वि. आपले त|| ३० माहे गुदस्तचे कृपापात्र पावले. त्याचप्रे|| पुण्याचे हायस्कुलातील भागवतमास्तर यांनी शंकर तुकाराम यांनी छापलेला पवाडयाचे पुस्तकातील काही शाहिरांची एक याद मजला आणून दिली, यावरून मी त्यास येक वेळी कळवले कि, सदरचे पवाडयाची प्रत मजजवळ नाही आणि ती पाहिल्याशिवाय मला याविषयी काही कळविता येत नाही. नंतर त्यांनी ते पुस्तक मला आणून दिले नाही. सबब त्याविषयी मला काही आपल्यास लिहून कळविता आले नाही.
..................... फितुरी गोपिनाथपंताचे साह्याने शिवाजीने दगा करून अफजुलखानाचा (वध?) केला. तान्हाजी मालूसऱ्याने घोरापाडीचे साह्याने सिंहगड किल्ला काबीज केला व शिवाजीने पुण्यात दरोडा घालून मुसलमान लोकांस कापून काढले. या सर्वाच्या कच्च्या हकीकतीचे खरे पोवाडे माझे पाहण्यात आले नाहीत. आज दिनपावेतो युरोपियन लोकांनी जे काही इतिहास तयार केले आहेत , ते सर्व क्षुद्र आणि अतिक्षुद्रांची वास्तविक स्थिती ताडून न पाहता +++ झाकून आर्यं भटब्राह्मणांचे ग्रंथावर व भटकामगारांचे सांगण्यावर भरवसा ठेऊन इतिहास तयार केले आहेत. व अलीकडे भटब्राह्मणांची विद्वान पोरेसोरे नवीन पवाडे करून हळूच मैदानात आणीत आहेत. त्यापैकी माझे पाहण्यातही बरेच आले आहेत आणि त्यातील क्षुद्रानी कमावलेल्या मोत्यापोवळ्यांचा चारा चरणारे भागवती, गोब्राह्मनासह दादोजी कोंडदेवास फाजील आगन्तुकी करावयास लावल्यामुळे तसल्या बनावट पवाड्यांचा मी संचय केला नाही.
------------------------------- आपला ---------
........................................
दूसरा भ्याला मेला बेत नव्हता पुर्वीचा .
दादोजी कोडदेवाचा.
मासा पाणी खेले गुरु कोण असे त्याचा...???
No comments:
Post a Comment