Thursday, August 26, 2010
दादोजी कोंडदेवांच्या पुतळाप्रश्नी समिती नेमनार
सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 26, 2010 AT 04:37 PM (IST)
Tags: lal mahal, pune, sambhaji brigade, municipal corporation, dadoji konddev
पुणे - लाल महालातील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यासंदर्भात सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन तज्ञांची समिती नेमावी. समिती जो अहवाल सादर करेल, त्यावर सर्वसाधारण सभेने निर्णय घ्यावा, असा निर्णय महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.२६) झालेल्या महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवावा, या मागणीसाठी लोकशासन आंदोलनाच्या वतीने काल महापालिकेवर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी हा पुतळा चोवीस तासात हटविण्याचे आश्वासन महापौरांनी आंदोलनकर्त्यांना दिले होते. तसेच पुतळा हलविण्याचे आदेश द्यावेत, असे पत्र आयुक्तांना दिले होते. त्यावर आयुक्तांनी पुतळा हटविण्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पक्षनेत्यांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घ्यावा, असे पत्र महापौरांना काल रात्री पाठविले होते. त्यानुसार आज सकाळी पक्षनेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये हा ठराव करण्यात आला. त्यामुळे आता या विषयावर इतिहास तज्ञांची समिती नेमावी, त्यांच्याकडून जो अहवाल प्राप्त होईल, त्यावर सर्वसाधारण सभेने निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव पुढील महिन्याच्या सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात येणार आहे.

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment