Tuesday, December 28, 2010
आनंदोत्सव .....
Dadoji Was Not Teacher Of Shivaji Maharaj - Historian Imran Habib...
दादोजी गुरू नव्हते : इमरान हबीब
Imran habib spoke to Star Majha On Dadoji Konddev Issue..saying dadoji was not a teacher of shivaji ..corporation has removed statue of dadoji..which is justice to shivaji's history...
दादोजी कोंडदेव पुतळा हटविल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवरून येताच महाराष्ट्रभरात जल्लोष सुरु झाला.. ठिकठिकाणी पेढे वाटून,फटाके फोडून शिवप्रेमी आनंद व्यक्त करत होते... पुणे,मुंबई,कोल्हापूर,सातारा,सांगली,औरंगाबाद,बुलढाणा,चंदपूर,नांदेड,नागपूर,यवतमाळ,उस्मानाबाद ह्या भागात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला..विशेष म्हणजे मराठवाड,खानदेश आणि विदर्भाच्या ग्रामीण भागातही प्रचंड उत्साह दिसून येत होता.. शिवसेनेने ह्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेवूनही पुणे आणि औरंगाबाद येथे तुरळक घटना वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही..वेगवेगळ्या संघटना,राजकीय पक्ष आणि साहित्यिक ह्यांनी ह्या निर्णयाबद्दल भरभरून प्रतीक्रिया दिल्या आहेत..
दादोजी समर्थकांच्या बंदला प्रतिसादच नाही...पुणे सुरळीत...दादोजी समर्थक नाराज..
पुण्याच्या लालमहलातुन दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला. या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या पुणे बंदला अतिशय कमी प्रतिसाद मिळला आहे. पुण्यातले शाळा कॉलेजेस व्यवस्थित सुरु आहेत. तसेच बस सेवा आणि रिक्षाही सुरू आहेत. सकाळी पुण्यातल्या काही भागात बसेसवर दगडफेक करण्यात आली. जवळपास बसेस फोडण्यात आल्या.अनेक भागात दुकान सुरू आहेत. पीएमटी सेवाही सुरळीत सुरु आहे.पुण्याच्या सदैव गर्दी असणार्या लक्ष्मी रोडवरची अनेक दुकान सुरु आहेत. इतर ठिकाणच्या बाजारपेठ चालु आहे. एकंदर शिवसेनेच्या बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही..."पुतळा हलविला बरे झाले.." असा सामान्य जनतेचा सूर होता..त्याच बरोबर काही दादोजी समर्थकांच्या फुसक्या आंदोलनाचा निषेधही होत आहे..
Monday, December 27, 2010
दादोजींचा पुतळा काढला!
दादोजींचा पुतळा काढला!
पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री दोन वाजता हटवण्यात आला. पुणे महानगपालिका आणि पोलिसांनी ही कारवाई केली. त्या मुळे महाराष्ट्रभरातील शिवप्रेमी जनतेत आनंदाची लाट उसळली आहे..
मध्यरात्री दोन वाजता दादोजींचा पुतळा कटरच्या सहाय्याने कापला गेला आणि एका टेम्पोत टाकून अज्ञात स्थळी नेण्यात आला. त्याआधी शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱहे यांच्यासह पुतळ्याच्या समर्थनासाठी जमलेल्या सेना-भाजप 40 कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले होते. नंतर त्यांना सोडण्यात आले.
दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यासाठी माजी न्यायमूर्ती पी बी सावंत ,बी.जी.कोळसे-पाटीलसह यांच्या शिवप्रेमी जनजागृती समिती,शिवसंग्राम,छावा,बामसेफ,समता परिषद भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले होते.ह्या आंदोलनाला महाराष्ट्रातील ८३ सामाजिक संघटना आणि 7 राजकीय पक्षांचा पाठिंबा होता ...
Saturday, December 25, 2010
26 Dec 2010, 0059 hrs IST
' दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, हा इतिहास राज्य सरकारनेही मान्य केला आहे. कोंडदेव हे नाटकातील पात्र मनुवाद्यांनी इतिहासाचे विदुपीकरण करून शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आणले', असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद आव्हाड यांनी केला. 'हा खोटा इतिहास बदलण्याची गरज असून ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलण्याचा प्रस्ताव काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ठाणे महापालिकेच्या पुढील महासभेत आणणार आहे', असे त्यांनी सांगितले.
Friday, December 24, 2010
संमेलन स्थळी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
ठाण्यात होत असलेल्या 84 वे साहित्य संमेलन बंद पाडू असा इशारा दिलेल्या संभाजी ब्रिगेडने ग्रंथ दिंडी निघण्या अगोदरदादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर आंदोलन केले. यावेळी स्टेडियमबाहेर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाचा फलक लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. यावरून शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी 18 लोकांना ताब्यात घेतलं आहे.
Thursday, December 23, 2010
"दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत व दादोजींचे उदात्तीकरण ह्यापुढे होणार नाही"...असा ठराव संमेलनात करता येवू शकतो - चर्चेतील तोडगा.
काल रात्री ९:४५ ला झालेल्या आय.बी.एन. लोकमत वाहिनीवरील "आजचा सवाल" ह्या कार्यक्रमाचा विषय "'दादोजी कोंडदेव' नावाचा वाद साहित्य संमेलनात आणणं योग्य आहे का ?" असा होता..ह्या चर्चेत साहित्य संमेलनाचे संयोजक दा.कृ.सोमण, पत्रकार विजय चोरमारे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड सहभागी झाले होते.
ह्या कार्यक्रमात बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले कि..दादोजींचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून वगळले आहे..दादोजी कोंडदेव नावाचा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार बंद करण्यात आला आहे..लाल महालातील दादोजींचा पुतळाही काढला जाणार आहे..
ठाणे येथे असलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदल हि आमची २००४ पासूनची मागणी आहे..त्या संदर्भात आम्ही महानगर पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत..पण महानगर पालिका त्याची दाखल घेत नसल्याने व दादोजींचे उदात्तीकरण हे कथा ,कादंबर्या अश्या साहित्यामधून झाल्यामुळे साहित्यिकांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी...हे सांगण्यासाठी हे संमेलन उधळून लावणार असल्याचे त्यांनी सांगितले..
दा.कृ.सोमण ह्यांनी संमेलन उधळू नये अशी विनंती करत हा प्रश्न महापालिकेचा असल्याचे सांगितले..त्यामुळे आपल्या हाती काही नसल्याचे सांगतानाच त्यावर साहित्यिक विश्वात चर्चा घडवून आणू शकतो असे आश्वासन दिले..
"दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत व दादोजींचे उदात्तीकरण ह्या पुढे होणार नाही"...असा ठराव साहित्य संमेलनात करता येवू शकतो.....साहित्य महामंडळाने ह्या साठी पुढाकार घ्यावा..अशी सूचनाही जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे ह्यांनी दिली..महाराष्ट्र शासनाने असा अहवाल दिला असल्याने हे सहज शक्य असल्याचेही ते म्हणाले .
शिवाय महाराष्ट्रातील ७८% जनतेनेही पोलच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या मागणीला पाठींबा दिला ..
ठाण्यात शुक्रवारपासून होणाऱ्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘दादोजी कोंडदेव’ हा आता वादाचा मुद्दा ठरल्याने साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच पोलीस बंदोबस्तासह खाजगी सुरक्षा यंत्रणाही तैनात होणार आहे. हे साहित्य संमेलन जिथे भरणार आहे त्या ‘दादोजी कोंडदेव स्टेडियम’चे नाव बदलावे अन्यथा संमेलन होऊ देणार नाही, असा इशारा ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेने दिला आहे. पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्याचा निर्णय महापालिकेत गुरुवारी बहुमताने संमत झाल्यानंतर ‘ब्रिगेड’चा जोर वाढल्याने हे साहित्य संमेलन झाकोळले आहे.संमेलनाचे कार्यवाह विदयाधर ठाणेकर यांनी संमेलनासाठी पोलिस बंदोबस्त असून संमेलन सुरळित संपन्न व्हावे यासाठी महाविदयालयीन युवकांच्या स्वयंसेवकांसह खाजगी सुरक्षारक्षकही ठेवण्यात आल्याचे सांगितले. ८४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्त्तम कांबळे यांनी मात्र पुण्यातील घटनेसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. संभाजी बिग्रेडने साहित्य संमेलनात आपले राजकारण आणू नये. स्टेडियमचे हे नाव आजच देण्यात आलेले नाही. ते फार पूर्वीचे आहे. त्यामुळे बिग्रेडने आपला पराक्रम राज्य शासनाच्या शालेय धोरणावर दाखवावा. असे त्यांनी सांगितले.
आयबीएन-लोकमत वाहिनीवरील एका चर्चासत्रात संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मात्र दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव उद्याच आमचे कार्यकर्ते बदलतील आणि त्याला प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव देतील, असे जाहीर केले.
अखेर यश..लाल महलातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवणार
23 डिसेंबर
पुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा अखेर हलवला जाणार आहे. पुण्याच्या लालमहालात असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याचा ठराव पुणे महानगरपालिकेने मंजूर केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा या ठरावाला पाठिंबा दिला आहे. 54 विरुध्द 37 मतानी ठराव पारित करण्यात आला. या ठरावाला मनसेनं मात्र तटस्थ भुमिका घेतली. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात यावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी होती यासंदर्भात आज पर्यंत अनेक आंदोलन करण्यात आली.
दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्यासाठी 25 ऑगस्ट 2010 रोजी लोकशासन आंदोलन समितीच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन माजी न्यामूर्ती पी.बी.सावंत आणि बी.जी. कोळसे- पाटील यांच्या नेतृत्वखाली करण्यात आले होते. यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल यांनी लालमहालाच्या ठिकाणी जाऊन दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याची घोषणा केली होती. मात्र दूसर्यादिवशी महानगरपालिकेत सर्वपक्षीय बैठक घेऊन लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होती.
महानगरपालिकेत सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यासाठी आपण एक समिती नेमू आणि या समितीच्या अहवालानंतर यावर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आले होते. महापालिकेच्या या निर्णयानंतर संतापलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या दालनाबाहेर सुरक्षारक्षकास धक्काबुक्की केली होती.
पुणे - लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवून त्याच्या जागी शहाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (गुरुवार) घेण्यात आला.
लाल महालात बाल शिवाजी सोन्याच्या नांगराने पुण्याची भूमी नांगरित असल्याचे समूह शिल्प काही वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. त्यामध्ये दादोजी कोंडदेव यांचे शिल्पही उभारण्यात आले आहे. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढून टाकण्याबाबत पुण्यातील संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही होत्या. त्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला असावा.
Wednesday, December 22, 2010
जाणता राजा या महानाट्याच्या निर्मात्यांनी संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांपुढे माघार घेतली
संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपानंतर जाणता राजाच्या नव्या प्रयोगात दादोजी कोंडदेवांचे महत्व कमी करण्यात आलं. तसेच गागाभट्टांच्या तोंडचे एक वाक्य ही वगळण्यात आलं. आणि त्यात संभाजी ब्रिगेडला यश येतं असल्याचे दिसतं आहे. आपल्या आक्षेपानंतर नव्या प्रयोगांमध्ये दुरुस्त्या करण्यात येतात की नाही हे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कालचा प्रयोग पाहून खात्री करुन घेतली. पण अजूनही संभाजी ब्रिगेडचे सर्व आक्षेप मान्य करण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आलं. 15 दिवसांत सुधारणा केल्या नाहीतर बाबासाहेब पुरंदरेंच्या घरापुढे आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.
संभाजी ब्रिगेडच्या आक्षेप
- महानाट्यात दादोजी कोंडदेवांचे उदात्तीकरण नको
- शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी गागाभट्टांच्या तोंडी असलेले एक वाक्य वगळा
- राज्याभिषेक सोहळा सुरू असताना समर्थ रामदास सोहळा थांबवून जय जय रघुवीर समर्थचा घोष करतात
- नव्या प्रयोगात हा प्रसंग मात्र कायम आहे
जाणता राजामध्ये राज्यभिषेकाच्यावेळी गागाभट्टांच्या तोडी एक वाक्य आहे त्यात गागाभट्ट म्हणतात की, "महाराज आपण छत्रपती झाला आहात. परंतु आपण धर्मविरोधी कृत्य केल्यास धर्म-मार्तंड हा धर्मदंड आपल्या मस्तकी मारतील" संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपानंतर हे वाक्य वगळण्यात आलं.
पुरंदरे यांच्या घरासमोर आंदोलन करणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'जाणता राजा' या महानाट्यातील काही आक्षेपार्ह विधाने काढून टाकण्याच्या मागणीसाठी महानाट्याचे निर्माते बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
पुण्यात शिवसाई प्रतिष्ठानने 'जाणता राजा'चे प्रयोग ठेवले आहेत. महानाट्यात दादोजी कोंडदेव व रामदास स्वामी यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडने हे प्रयोग उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महानाट्यातून दादोजी व रामदास स्वामी यांच्यावर आधारित काही भाग वगळण्यात आला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल, अशी विधाने महानाट्यातून काढली गेली नाहीत, असा संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे. महानाट्यातील शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यात गागाभट्ट यांच्या मुखी काही अवमानकारक विधाने घालण्यात आली आहेत. ही विधाने वगळण्यासाठी नाटकाचे निर्माते पुरंदरे यांच्या घरासमोर पंधरा दिवसांनी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, सरचिटणीस संतोष शिंदे, मराठा महासभेचे अध्यक्ष जगजीवन काळे, शिवराज्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अक्षय आहेर यांनी दिला.
संभाजी ब्रिगेडने आंदोलन करू नये..शिवसेना.
दरम्यान हा महानगरपालिकेचा विषय असल्याने त्यावर त्यांनीच निर्णय घ्यावा असे मत वसंत डावखरे यांनी व्यक्त केले.
ठाण्यातल्या साहित्य संमेलन संयोजकांनी मागितले तर संरक्षण पुरवू असं सांगतानाच आंदोलकांनी तोडफोड करू नये लोकशाही मार्गाने मागण्या मांडाव्यात असं प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदलण्याच्या मागणीबाबत काल केले होते.
Tuesday, December 21, 2010
ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदला..संभाजी ब्रिगेडची मागणी..
ठाणे - दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाचे नाव न बदलल्यास ठाण्यात होणारे मराठी साहित्य संमेलन उधळण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष जनार्दन चव्हाण यांनी दिला आहे. त्यासाठी उग्र आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात 24 संघटनांचा सहभाग असणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शासकीय विश्रामगृहात जनार्दन चव्हाण यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संमेलन उधळण्याचा इशारा दिला. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याचा पुरावा आम्ही सादर केला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वारंवार दादोजी कोंडदेव यांच्या नावाने असलेल्या क्रीडा प्रेक्षागृहाचा उल्लेख होत आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. या विषयावर ठाण्याचे महापौर अशोक वैती यांना पत्र दिले होते. तसेच जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनाही पत्र देऊन दादोजी कोंडदेवांच्या नावाने असलेल्या क्रीडाप्रेक्षागृहात संमेलन घेण्यास विरोध असल्याचे कळविले होते. त्यावेळी चर्चेला बोलावण्याऐवजी मला कारवाईची नोटीस बजावण्यात आली, पण माझ्यावर कारवाई झाली तरी मी आंदोलन मागे घेणार नाही. मराठी साहित्य संमेलनाला आमचा विरोध नाही. केवळ कार्यक्रमाच्या स्थळाच्या नावाला आक्षेप आहे. आमच्या विरोधाची दखल न घेतल्यास कोणत्याही क्षणी संभाजी ब्रिगेडतर्फे दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाच्या नावावर दुसरे नाव लावण्याचा इशारा जनार्दन चव्हाण यांनी दिला आहे.
ठाण्यातल्या साहित्य संमेलन संयोजकांनी मागितलं तर संरक्षण पुरवू तसेच आंदोलकांनी तोडफोड करू नये लोकशाही मार्गाने मागण्या मांडाव्यात असं प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदलण्याच्या मागणीबाबत केले.
पुणे येथील जाणता राजा हे महानाट्य उधळून लावणार -संभाजी ब्रिगेड
बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा हे महानाट्य पुण्यात होत असून ते उधळून लावण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे..बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी जेम्स लेन ला मदत केल्याचा आरोप गेल्या काही वर्षात अनेक संघटनानी केला आहे.त्या पार्श्वभूमीवर पुरंदरे हे रामदास आणि दादोजी कोंडदेव ह्यांचे उदात्तीकरण करत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेड व अन्य संघटना आक्रमक झाल्या आहेत
दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदला अन्यथा संमेलन उधळून लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडने काही दिवसांपूर्वी केला होता. आर. आर. पाटील यांनी सावध भूमिका घेत वाद टाळण्याचा सल्ला दिला मात्र जाणता राजा यां महानाट्यातील दादोजी कोंडदेव आणि रामदास यांच्या व्यक्तीरेखा वगळा अन्यथा प्रयोग होऊ देणार नाही याबाबतच्या प्रश्नावर भाष्य करणं आबांनी टाळलं.