Wednesday, December 22, 2010

जाणता राजा या महानाट्याच्या निर्मात्यांनी संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांपुढे माघार घेतली

जाणता राजा या महानाट्याच्या निर्मात्यांनी संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांपुढे माघार घेतली
संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपानंतर जाणता राजाच्या नव्या प्रयोगात दादोजी कोंडदेवांचे महत्व कमी करण्यात आलं. तसेच गागाभट्टांच्या तोंडचे एक वाक्य ही वगळण्यात आलं. आणि त्यात संभाजी ब्रिगेडला यश येतं असल्याचे दिसतं आहे. आपल्या आक्षेपानंतर नव्या प्रयोगांमध्ये दुरुस्त्या करण्यात येतात की नाही हे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कालचा प्रयोग पाहून खात्री करुन घेतली. पण अजूनही संभाजी ब्रिगेडचे सर्व आक्षेप मान्य करण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आलं. 15 दिवसांत सुधारणा केल्या नाहीतर बाबासाहेब पुरंदरेंच्या घरापुढे आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.

संभाजी ब्रिगेडच्या आक्षेप

- महानाट्यात दादोजी कोंडदेवांचे उदात्तीकरण नको
- शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी गागाभट्टांच्या तोंडी असलेले एक वाक्य वगळा
- राज्याभिषेक सोहळा सुरू असताना समर्थ रामदास सोहळा थांबवून जय जय रघुवीर समर्थचा घोष करतात
- नव्या प्रयोगात हा प्रसंग मात्र कायम आहे

जाणता राजामध्ये राज्यभिषेकाच्यावेळी गागाभट्टांच्या तोडी एक वाक्य आहे त्यात गागाभट्ट म्हणतात की, "महाराज आपण छत्रपती झाला आहात. परंतु आपण धर्मविरोधी कृत्य केल्यास धर्म-मार्तंड हा धर्मदंड आपल्या मस्तकी मारतील" संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपानंतर हे वाक्य वगळण्यात आलं.

पुरंदरे यांच्या घरासमोर आंदोलन करणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'जाणता राजा' या महानाट्यातील काही आक्षेपार्ह विधाने काढून टाकण्याच्या मागणीसाठी महानाट्याचे निर्माते बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

पुण्यात शिवसाई प्रतिष्ठानने 'जाणता राजा'चे प्रयोग ठेवले आहेत. महानाट्यात दादोजी कोंडदेव व रामदास स्वामी यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडने हे प्रयोग उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महानाट्यातून दादोजी व रामदास स्वामी यांच्यावर आधारित काही भाग वगळण्यात आला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल, अशी विधाने महानाट्यातून काढली गेली नाहीत, असा संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे. महानाट्यातील शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यात गागाभट्ट यांच्या मुखी काही अवमानकारक विधाने घालण्यात आली आहेत. ही विधाने वगळण्यासाठी नाटकाचे निर्माते पुरंदरे यांच्या घरासमोर पंधरा दिवसांनी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, सरचिटणीस संतोष शिंदे, मराठा महासभेचे अध्यक्ष जगजीवन काळे, शिवराज्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अक्षय आहेर यांनी दिला.

No comments: