Thursday, December 23, 2010

"दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत व दादोजींचे उदात्तीकरण ह्यापुढे होणार नाही"...असा ठराव संमेलनात करता येवू शकतो - चर्चेतील तोडगा.

स्टेडीयमचे नाव बदलून प्रबोधनकार ठाकरे स्टेडीयम करणार.... संमेलनात ठराव करावेत..अन्यथा संमेलन उधळू..- संभाजी ब्रिगेड

काल रात्री ९:४५ ला झालेल्या आय.बी.एन. लोकमत वाहिनीवरील "आजचा सवाल" ह्या कार्यक्रमाचा विषय "'दादोजी कोंडदेव' नावाचा वाद साहित्य संमेलनात आणणं योग्य आहे का ?" असा होता..ह्या चर्चेत साहित्य संमेलनाचे संयोजक दा.कृ.सोमण, पत्रकार विजय चोरमारे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड सहभागी झाले होते.
ह्या कार्यक्रमात बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले कि..दादोजींचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून वगळले आहे..दादोजी कोंडदेव नावाचा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार बंद करण्यात आला आहे..लाल महालातील दादोजींचा पुतळाही काढला जाणार आहे..
ठाणे येथे असलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदल हि आमची २००४ पासूनची मागणी आहे..त्या संदर्भात आम्ही महानगर पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत..पण महानगर पालिका त्याची दाखल घेत नसल्याने व दादोजींचे उदात्तीकरण हे कथा ,कादंबर्या अश्या साहित्यामधून झाल्यामुळे साहित्यिकांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी...हे सांगण्यासाठी हे संमेलन उधळून लावणार असल्याचे त्यांनी सांगितले..

दा.कृ.सोमण ह्यांनी संमेलन उधळू नये अशी विनंती करत हा प्रश्न महापालिकेचा असल्याचे सांगितले..त्यामुळे आपल्या हाती काही नसल्याचे सांगतानाच त्यावर साहित्यिक विश्वात चर्चा घडवून आणू शकतो असे आश्वासन दिले..
"दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत व दादोजींचे उदात्तीकरण ह्या पुढे होणार नाही"...असा ठराव साहित्य संमेलनात करता येवू शकतो.....साहित्य महामंडळाने ह्या साठी पुढाकार घ्यावा..अशी सूचनाही जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे ह्यांनी दिली..महाराष्ट्र शासनाने असा अहवाल दिला असल्याने हे सहज शक्य असल्याचेही ते म्हणाले .

शिवाय महाराष्ट्रातील ७८% जनतेनेही पोलच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या मागणीला पाठींबा दिला ..

ठाण्यात शुक्रवारपासून होणाऱ्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘दादोजी कोंडदेव’ हा आता वादाचा मुद्दा ठरल्याने साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच पोलीस बंदोबस्तासह खाजगी सुरक्षा यंत्रणाही तैनात होणार आहे. हे साहित्य संमेलन जिथे भरणार आहे त्या ‘दादोजी कोंडदेव स्टेडियम’चे नाव बदलावे अन्यथा संमेलन होऊ देणार नाही, असा इशारा ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेने दिला आहे. पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्याचा निर्णय महापालिकेत गुरुवारी बहुमताने संमत झाल्यानंतर ‘ब्रिगेड’चा जोर वाढल्याने हे साहित्य संमेलन झाकोळले आहे.संमेलनाचे कार्यवाह विदयाधर ठाणेकर यांनी संमेलनासाठी पोलिस बंदोबस्त असून संमेलन सुरळित संपन्न व्हावे यासाठी महाविदयालयीन युवकांच्या स्वयंसेवकांसह खाजगी सुरक्षारक्षकही ठेवण्यात आल्याचे सांगितले. ८४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्त्तम कांबळे यांनी मात्र पुण्यातील घटनेसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. संभाजी बिग्रेडने साहित्य संमेलनात आपले राजकारण आणू नये. स्टेडियमचे हे नाव आजच देण्यात आलेले नाही. ते फार पूर्वीचे आहे. त्यामुळे बिग्रेडने आपला पराक्रम राज्य शासनाच्या शालेय धोरणावर दाखवावा. असे त्यांनी सांगितले.
आयबीएन-लोकमत वाहिनीवरील एका चर्चासत्रात संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मात्र दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव उद्याच आमचे कार्यकर्ते बदलतील आणि त्याला प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव देतील, असे जाहीर केले.

No comments: