23 डिसेंबर
पुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा अखेर हलवला जाणार आहे. पुण्याच्या लालमहालात असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याचा ठराव पुणे महानगरपालिकेने मंजूर केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा या ठरावाला पाठिंबा दिला आहे. 54 विरुध्द 37 मतानी ठराव पारित करण्यात आला. या ठरावाला मनसेनं मात्र तटस्थ भुमिका घेतली. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात यावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी होती यासंदर्भात आज पर्यंत अनेक आंदोलन करण्यात आली.
दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्यासाठी 25 ऑगस्ट 2010 रोजी लोकशासन आंदोलन समितीच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन माजी न्यामूर्ती पी.बी.सावंत आणि बी.जी. कोळसे- पाटील यांच्या नेतृत्वखाली करण्यात आले होते. यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल यांनी लालमहालाच्या ठिकाणी जाऊन दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याची घोषणा केली होती. मात्र दूसर्यादिवशी महानगरपालिकेत सर्वपक्षीय बैठक घेऊन लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होती.
महानगरपालिकेत सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यासाठी आपण एक समिती नेमू आणि या समितीच्या अहवालानंतर यावर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आले होते. महापालिकेच्या या निर्णयानंतर संतापलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या दालनाबाहेर सुरक्षारक्षकास धक्काबुक्की केली होती.
पुणे - लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवून त्याच्या जागी शहाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (गुरुवार) घेण्यात आला.
लाल महालात बाल शिवाजी सोन्याच्या नांगराने पुण्याची भूमी नांगरित असल्याचे समूह शिल्प काही वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. त्यामध्ये दादोजी कोंडदेव यांचे शिल्पही उभारण्यात आले आहे. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढून टाकण्याबाबत पुण्यातील संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही होत्या. त्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला असावा.
No comments:
Post a Comment