Friday, October 8, 2010

दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव

दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव

by Sanjay Sonawani on Thursday, October 7, 2010 at 8:18pm

१. दादोजी कोंडदेव हे प्रथमपासुन शहाजी राजांचे चाकर होते.

-हे सत्य नाही. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे १६३६ पर्यन्त चाकर होते आणि ते आदिलशहातर्फे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार होते, ती सुभेदारी पुढेही कायम झाली पण शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष्य ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. ते सी. के. पी. होते असा एक मतप्रवाह आहे, पण तोही खरा नाही. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे निधन झाले.

शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली झाला. तेंव्हा दादोजी कोंडाना किल्ल्यची सुभेदारी आदिलशहातर्फे पहात होते. कोंडाना किल्ला शिवाजी महाराजांनी १६५७ साली काबीज केला...तो शहाजी राजांच्या जहागिरीत नव्हता....पण दादोजी कोंडान्याचे सुभेदारही होतेच...पण हयातीत त्यांनी शिवाजीमहाराजांना तो किल्ला मिळु दिला नाही.

१६३६ ते म्रुत्युपर्यंत दादोजी शहाजीराजांच्या सेवेत होते. शिवाजी महाराज दादोजी सेवेत आले तेंव्हा ६ वर्षांचे होते. असे मानले जाते कि शिवाजीमहाराज यांना लिहिता वाचता येत नव्हते. दादोजी जर त्यांचे गुरु असते तर असे घडले नसते. दुसरे असे कि दादोजी हे शिवाजीमहाराजांच्या स्वराज्य प्रयत्नांबाबत नेहमीच विरोधात होते. दादोजी हे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार असुनही त्यांनी हयातीत शिवाजी महाराजांच्या हवाली किल्ला केला नव्हता हेही येथे लक्षात ठेवायला हवे. "तारिख-इ-शिवाजी" असे म्हनते कि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य-धडपडीला वैतागुन दादोजींनी वीष घेवुन आत्महत्या केली. त्यासमयी त्यांचे वय ७२ होते. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला होता.(१६४५). त्यावेळी शिवाजीमहाराजांचे वय १५ वर्ष असेल. त्यामुळे युद्धकला दादोजींनी शिवाजी महाराजांना शिकवली असे म्हणता येत नाही...आणि नंतर अवघ्या २ वर्षांत दादोजींचे निधन झाले.

आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे.


१६२५: शहाजी राजांनी रंगो बापुजी धडफळे यांस पुणे, सुपे प्रांताचा कारभारी म्हणुन नेमले होते. ही जहागिरी शहाजी राजांकडॆ १६२४ साली आली. जर दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असती दादोजी हेच शहाजी राजांचे पहीले कारभारी बनले असते. शहाजीराजे... तेंव्हा निजामशाहीत होते.

१६३०: मुरारीपंत जोगदेव या विजापुरच्या ब्राह्म्न सरदाराने पुण्यावर हल्ला केला आणि पुणे पुरेपुर उध्वस्त करुन त्यावरुन गाढवाचा नांगर फिरवला. अदिलशहा शाहाजी राजांचा द्वेष करत होता हे स्पष्ट होते, कारण शहाजी राजे निजामशाहेचे शासक सरदार बनले होते. पुणे वाचवण्यासाठी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींनी प्रयत्न न करणे स्वाभाविक होते.

त्याच वर्षी शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. हा किल्ला तेंव्हा निजामशाहीत होता व जिजावु गरोदर असतांनाच तेथे एका विवाहाप्रित्यर्थ आल्या होत्या.

१६३६: निजामशाहीचा अंत आणि शहाजी राजांना आदिलशाहेत जाणे भाग पडने. त्याच वर्षी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींना पुणे-सुपे प्रांताचे कारभारी पद दिले. यामागे एकच हेतु असु शकतो तो हा कि नवीन राजकीय समीकरणांशी जुळवुन घायला वेळ मिळावा आणि आदिलशहाचे नवे संकट नको. पण याच वेळेस शहाजी राजे बाल शिवाजी (६ वर्ष वय) आणि जिजावुंना सोबत विजापुरी घेवुन गेले.

थोडक्यात दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असण्याची शक्यता नाही. शहाजी राजांचा जन्म १६०१ मद्धे झाला. दादोजींचा जन्म १५७५ मधील. निजमशाही आणि आदिलशाही यातुन विस्तव जात नव्हता. पुण्यावर मुरारपंतांनी रानटी हल्ला चढवुनही दादोजींना पुणे वाचावे असे वाटलेले दिसत नाही. (ते कोंडाण्याचे सुभेदार होते) आणि याच दादोजींनी त्याच गाढवाचा नांगर एका ब्राह्मणानेच फिरवला त्याच उध्वस्त नगरात स्व:प्रेरणेने सोण्याचा नांगर फिरवण्याचे सोपस्कार केले असतील हे पटत नाही. त्यांनी शाहाजीराजांची इछा आणि आदेश पाळले असेच फार तर म्हनता येते...कारण ही जहागिर भविष्यासाठी त्यांनी हर-प्रकारे राखुन ठेवली...तीच जहागिर त्यांनी आपल्या पहिल्या स्वतंत्र्य लढ्यासाठी वापरली...ती अनेकदा जप्त झाली असली तरी पुन्हा पुन्हा त्याच जहगिरिच्या सनदा मिळवल्या, जी जहागिर आदिलशहाच्या नोकराने उद्ध्वस्त केली तीच जहागिर त्यांनी आदिलशहाच्याच कारभार्याहस्ते पुन्हा उभारुन घेतली...आणि आपल्या पुत्राहस्ते तीच पुण्यभूमी पहिल्या स्वराज्यासाठी पुत्रा-हवाली केली. येथे मला शहाजी महाराजांच्या दुरद्रुष्टीचे, कर्तेपणाचे आणि त्यांच्या परकोटीच्या आत्मभानाचे आदर्श सर्वांनी घ्यायला हवे असे वाटते. हेच गुण शिवाजीमहाराजांत स्फुल्लिंगाप्रमाणे त्यांच्या जीवनभर तळपतांना दिसतात.

या पार्श्वभुमीवर अत्यंत खोटे बिनदिक्कत सांगणार्यांची कीव वाटते... जेथे प्रतिवाद संपतो तेथे "आता जुन्या गोष्टी कशाला उगाळायच्या?" असे काहिसे म्हणुन पळवाट काढली जाते, पण या जुन्या गोष्टॆए ज्यांनी विक्रुत करुन ठेवल्या आहेत, सत्य दडपले आहे-लपवले आहे-लपवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांचे काय करायचे? "माझा बाप कोण होता" हे यांनीच बिनदिक्कतपणे सांगायचे....मला माझाच बाप कोण होता या शोधमोहिमेवर पाठवुन द्यायचे...आणि सत्य समोर आले कि जुने कशाला उकरत बसता हे यांचेच आलाप ऐकायचे हा धंदा आता चालणार नाही. मग ते कोणेही असोत...मनोविक्रुतांना कोणत्याही समाजात स्थान नसते. ते नसावे..



No comments: