Wednesday, October 13, 2010

बहुजन समाज जागृत झाला असून अजूनही हा पुतळा हाटवला नाही तर तीव्र आंदोलन..

वास्तवाचा शोध घेऊन इतिहास समाजासमोर मांडावा
(Updated on 11/10/2010 0 : 19 IST)

लातूर (प्रतिनिधी) : इतिहासचे विकृत पद्धतीने लेखन केले जात आहे व त्यातून राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या महापुरुषांचे चारित्र्य मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तवाचा शोध घेऊन इतिहास
समाजासमोर मांडावा, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कार्यकारिणी चिटणीस प्रा. एस. व्ही. जाधव यांनी केले.
पत्रकार भवन येथे आयोजित दादोजी कोंडदेव हटाव परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष अ‍ॅड. गौतम भालेराव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एस. व्ही. जाधव, प्रा. माधव गादेकर, कॉ. मुर्गप्पा खुमसे, शेकापचे राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण गोळेगावकर, प्रा. अर्जून जाधव, डॉ. श्रीराम गुंंदेकर, जमाअत-ए-इस्लामीचे इक्राम शेख, के. ई. हरिदास आदी मान्यवर उपस्थित होेते.
या वेळी पुढे बोलताना जाधव म्हणाले
दादोजी गोंडदेव कारकून म्हणून शिवरायाच्या काळात कार्यरत असताना त्यांचा इतिहासात गुरु असा उल्लेख आहे. क्रीडा क्षेत्रांशी त्यांचा काहीही संबंध नसताना दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. खरा इतिहास समोर येताच हा प्रकार बंद करण्यात आला व पुणे महानगरपालिकेच्या वतीने लाल महालात दादोजी कोंडदेवाचा पुतळा उभारण्यात आले याला प्रारंभी विरोधही करण्यात आला व विरूनही गेला. पण पुन्हा बहुजन समाज जागृत झाला असून अजूनही हा पुतळा हाटवला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अध्यक्षीय समारोपात बोलताना अ‍ॅड. भालेराव म्हणाले की, आज गरज आहे. इतिहासाच्या तत्वज्ञानाची लिहलेल्या इतिहासातून चिकित्सा होऊन वास्तवाचा शोध घेऊन खरा इतिहास समाजासमोर मांडावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कोंडदेव हटाव परिषदेत कॉ. मुर्गाप्पा खुमसे, भाई लक्ष्मण गोळेगावकर, प्रा. अर्जून जाधव, प्रा. श्रीराम गुंदेकर आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. श्रीराम गुंदेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय जाधव यांनी केले तर आभार प्रा. पाटील यांनी मानले कार्यक्रमाला उपप्राचार्य उद्धव कोळपे, अ‍ॅड. उदय गवारे, प्रा. राजीव ढवळे, प्रा. किरण बिडवे, सतीश जाधव, दत्ता भोसले, सी. एस. माळी, प्रा. उत्तमराव जाधव, राजकुमार जाधव, समाधान शिंदे, दगडू गव्हाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments: