Saturday, October 9, 2010

दादोजी कोंडदेव सत्य इतिहास - अनंत दारवटकर ("अद्वितीय छ.श्रीसंभाजी महाराज")

दादोजी कोंडदेव सत्य इतिहास भाग १
दादोजी कोंडदेव सत्य इतिहास (साभार: अनंत दारवटकर लिखीत "अद्वितीय छ.श्रीसंभाजी महाराज) दादोजी कोंडदेवाचे आडनाव "गोचिवडे" होते१.तो शहाजी महाराजांकडे ज्या परगण्यांची वंशपरंपरागत पाटीलकी व देशमुखी जहागीरी होती त्या हिंगणी,बेरडी व देऊळगाव या परग्ण्यांचा कुलकर्णी व कानुंगो होता२.तसेच तो पाटस परगण्यातील मलठण गावचा हिशेबनीस होता.हे सर्व तो विजापुरकरांचा कारकुन म्हणुन विजापुरकरांसाठी करत होता.विजापुरकरांचसाठी करत असलेल्या कामाबद्दल इ.स.१६३० मध्ये त्याची बढती हवालदार पदापर्यंत झालेली दिसुन येते.ता.१८ सप्टेंबर १६३० च्या कौलनाम्यात "राजश्री पंत हवालदाराच कौलु दिल्हा आहे"३असा उल्लेख सापडतो.लखोजी जाधवरावांच्या म्रुत्युनंतर शहाजीराजे आपल्या जहागिरीच्या प्रांतात परतले.ते परांड्यावरुन संगमनेर येथुन लुटालुट करत पुण्यात आले होते.व त्यांनी अदिलशाही व निजामशाहीकडील अनेक किल्ले व प्रदेश घेण्याचा सपाटा लावला होता.तेव्हा विजापुरच्या खवासखानाचा कारभारी मुरार जगदेव याच्या सेनापतीत्वाखाली अदिलशाही सैन्याने शहाजीराजांच्या जहागीरीच्या प्रांतावर स्वारी केली४.ही स्वारी त्याने शके १५५२ म्हणजे इ.स.१६३०-३१ मध्ये केलेली होती५.या स्वारीबरोबर शहाजीराजे ३० नोव्हेंबर १६३० मध्ये आजमखान मोगलास मिळाले६.इकडे मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळोन गाढवाचा नांगर पांढरीवर धरिला७.यामुळे ७-८ वर्षे म्हणजे इ.स.१६३७ पर्यंत म्हणजे शहाजीराजे अदिलशाहीत जाइतोपर्यंत पुणे कसबा ओस पडला होता७.याचे दायीत्व अदिलशाही हवालदार म्हणुन दादोजी कोंडदेवाकडे जाते.यावेळी पुणे प्रांत शहाजी राजांची जहागिरी असली तरी त्यावर तात्पुरता अंमल मुरार जगदेवाच्या स्वारीमुळे अदिलशाहाचा होता व दादोजी कोंडदेव त्याची हवालदारकी करीत होता. दरम्यान निजामशाहीमध्ये उलथा-पालथ झाली.या संधीचा नेमका फायदा घेण्यासाठी शहाजी राजे मोगलांकडुन निजामशाहीत परतले.त्यांनी मुर्तुजा निजामशहास मांडीवर घेउन निजामशाहीचा कारभार पुर्ण अखत्यारीत सुरु केला.त्याच वेळी अदिलशहाने कोंडदेवास,पुणे प्रांताचा जो भाग अदिलशहाच्या ताब्यात होता त्याचा सुभेदार दिवाण केले.म्हणजे दादोजी कोंडदेव पुणे प्रांतातील अदिलशाही भागाचा "सुभेदार"झाला.दादोजी कोंडदेव सुभेदार असल्याचा उल्लेख जाउजी बिन हरजी व बापुजी बिन खेउजी घुले पाटील मौजे महंमदवाडी यांच्यासाठी दि.६ डिसेंबर १६३३ रोजी दिलेल्या मह्जरात सापडतो८.म्हणजे दादोजी कोंडदेवाने पुणे जाळण्यासाठी अदिलशहाच्या मुरार जगदेवास जे सहकार्य दिले होते त्याचे बक्शिस म्हणुन त्याची बढती "हवालदार" पदापासुन "सुभेदार" पदापर्यंत झाली होती असे ठरते.


(पुरावे:१.म्ह्सवडे जोशी यांचा महजर:अफजलखान वध,पा.२० तळटीप:श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७१. २.तारीख-इ-शिवाजी:शिवाजी द ग्रेट,भा.१,पा.२,१७:श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७१. ३.शि.प.सा.सं.क्र.३१२, ४.बु.उ.स.पा.२९८, ५,६.सहाकलमी शकावली, शिचप्र.,पा.७०,७१. ७.बादशहानामा,श्रीराशिछ-गभामे,पा.५८३, ८.शि.प.सा.सं.क्र.३७०,३७१.)

शिवजन्मापासुन ते दादोजी कोंडदेव विजापुरकरांचा सुभेदार होण्यापर्यंतच्या काळामध्ये दादोजी हा,जिजाऊ व शिवाजींच्या सेवेत असण्याचा काडीमात्र संबंध येत नाही.इ.स.१६३२ ते १६३६ अखेरपर्यंत शहाजी राजे मुर्तुजा निजामशहास मांडीवर घेऊन.निजामशाही सिंहासनावर बसुन कारभार करीत होते,मोगल आणि विजापुरकर यांच्याशी सतत संघर्ष व लढाई करीत होते,त्यावेळेस दादोजी कोंडदेव हा,शहाजी राजांच्या विरुध्द असलेल्या विजापुरकरांसाठी काम करीत होता.मुरार जगदेवाने पुणे जाळल्याने व शहाजी राजांचे मोगल व विजापुरकर यांच्या बरोबरील सततच्या लढाईमुळे पुणे परगणा ओसाड बनला होता१.अखेर अदिलशहा व मोगल शहाजहान यांच्यात करार झाला.मोगलांचा सेनापती खानजमान हा शहाजी राजांवर माहुली किल्ल्यावर चालुन गेला.येथे काही बाबी अदिलशहाच्या लक्शात आल्यानंतर खानजमान या मोगलाकडील सेनापतीचा हात ढिलाइने चालु आहे हे कारण पुढे करुन अदिलशहाने रणदुल्लाखानास पुढे करुन खानजमानच्या मदतीस पाठवीले.त्याने शहाजी राजास अदिलशहाकडे वळविले.आणि शहाजीराजांबरोबर करार केला.या करारानुसार मुर्तुजा निजामशहास खानजमान या मोगलाचे हवाली करुन माहुलीचा किल्ला आदिलशाहीत देऊन शहाजी राजे आदिलशाहीत सामील झाले२.तेव्हा पुणे परगणाही विजापुरांकडे गेला.आदिलशहाने विजापुर येथे शहाजी राजांचा सत्कार केला.त्यांना हत्ती,घोडे,जवाहीर देऊन पुणे,सुपे,बारामती,इंदापुर व बारा मावळे यांचा सरंजाम दिला३.परंतु त्याच वेळी आदिलशहाने त्याच्या फायदयाची एक महत्वाची गोष्ट केली,ती म्हणजे,पुणे प्रांताची सरंजामी दिलेल्या शहाजी राजांस पाठवीले कर्नाटकात,विजापुरच्याही दक्षिणेकडे आणि पुणे प्रांताचा कारभार सोपविला आपला विश्वासू माणुस दादोजी कोंडदेवाकडे !म्हणजे विजापुरकराने शहाजी राजांची जहागिरी कायम ठेवली परंतु विजापुरकरांकडे नोकरीस असलेल्या दादोजी कोंडदेवाकडे परगण्याचा कारभार पाहणेसाठी आला४.यावरुन दादोजी कोंडदेव कोणासाठी काम करीत होता हे लक्षात येते.तत्पुर्वी म्हणजे सन १६३६ च्या अगोदर पुणे परगणा निजामशहाकडे शहाजी राजांची जहागीर म्हणुन होता.तेव्हा त्याचा कारभार शहाजी राजांकडेच होता.त्यावेळेस दादोजी कोंडदेव विजापुरकरांचा चाकर असल्यामुळे त्याचा शहाजी राजांशी तथा शहाजी राजांतर्फे पुणे परगण्याच्या कारभाराशी संबंध नव्ह्ता. मुरार जगदेवाने पुणे जाळल्यापासुन पुढे सात-आठ वर्षे कसबा ओस पडला होता५.शहाजीराजे आदिलशाहीत आल्यानंतर, त्याचा कारभार दादोजी कोंडदेवाकडे आल्यानंतर म्हणजे इ.स.१६३६-३७ नंतर दादोजीने पुणे,इंदापुर व सुपे परगण्यांचा कारभार विजापुरकरांसाठी इमाने-इतबारे हाकण्यास सुरुवात केली.तत्पुर्वी पुणे परगण्याची स्थिती अत्यंत वाईट होती.त्याने त्यानंतर जंगली श्वापदांचा नायनाट करुन शेतीस उत्तेजन दिले.त्याने मलिक अंबरची महसुलाची पध्द्त-मलिक अंबरी धारा -स्वीकारुन विजापुरकराच्या खजीन्यात भर घातली व शहाजी राजांच्या जहागीरीत सुधारणा केली६.दादोजीच्या या इमाने इतबारीच्या सेवेबद्दल विजापुररांनी त्यास कोंडाण्याची सुभेदारी दिली.दि.२६ जानेवारी १६३८ मध्ये त्याने तंट्याबद्दल दिलेला एक महजर आहे. त्यात दादोजी कोंडदेऊ सुभेदार किल्ले कोंढाणा असा ऊल्लेख सापडतो७.त्याचप्रमाणे कोंढीतचा मोकादम बाबाजी नेलेकर याच्या हातुन गावची लावणी होइना यामुळे जनाजी खैरे व रुद्राजी जाधव परिंचेकर यांना मोकादमीचा वाटा देऊ करुन त्यांनी काम चालवील्यामुळे उत्पन्न झालेल्या तोट्याबाबत दिलेल्या महजरात दादोजी कोंडदेव सुभेदार८ असा उल्लेख सापडतो.

(पुरावे:१.श्रीशिछ९१ कलमी बखर क्र.२१;श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७१-७२. २.बु.-उ.-स.,पा.३३३.३.चिट्णीस२प्रकरण २.२.४.पादशहानामा (आयबी १५०);Shivaji and his Times,4th edn.page 18-19;श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७१;श्रीशिछ सच - मराचिब प्रकरण २.२ सहा कलमी शकावली ५. सहा कलमी बखर ६.श्रीशिछ ९१ क.ब.क.२१,श्रीशिछ सच -मराचिब प्रकरण २.२,श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७२ ७.शि.प.सा.सं.क्र.४३२. ८.शि.प.सा.सं.क्र.४३६.)

No comments: